
Arvind Kejriwal News: बेरोजगार महिलांना मासिक मानधन देण्याच्या योजनेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘आप’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पुजारी ग्रंथी सन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत केजरीवाल सरकार हिंदू आणि शीख पुजाऱ्यांना दरमहा १८,००० रुपये मानधन दिले जाणार आहे. या योजनेसाठी नोंदणी मंगळवारपासून सुरू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.







