
US India Have Agreed To Trade Deal: अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअऱ करत लिहिलं आहे की, “आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. ते माझे जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या देशाचे एक शक्तिशाली आणि आदरणीय नेते आहेत. आम्ही व्यापार आणि रशिया आणि युक्रेनसोबतचे युद्ध संपवणे यासह अनेक विषयांवर चर्चा केली”.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितल्यानंतर काही वेळातच, टॅरिफ 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करणार असल्याची घोषणा केली. या घोषणेमुळे भारत-अमेरिका संबंधांमधील तणाव निवळण्याचे संकेत मिळाले आहेत, जे मोठ्या शुल्कांमुळे बिघडले होते. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली असल्याचा दावाही केला आहे. तथापि, अमेरिकेत होणाऱ्या भारतीय निर्यातीवरील अतिरिक्त 25 टक्के शुल्क अद्याप कायम आहे.
बहुप्रतिक्षित अमेरिका-भारत व्यापार करारावरही डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केलं आहे. या कराराला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता कारण भारत अमेरिकेसाठी आपले कृषी क्षेत्र खुले करण्यास तयार नव्हतं. ट्रम्प यांनी अखेरीस एक करार होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.
US President Donald Trump announces a trade deal between the United States and India, lowers tariff from 25% to 18%.
President Donald Trump announced that India will buy over $500 billion of US. Energy, Technology, Agricultural, Coal, and many other products.
President Donald… pic.twitter.com/rsqBpSOdOE
— ANI (@ANI) February 2, 2026
ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी टॅरिफ कमी केले आहे आणि या कृतीला त्यांनी मैत्री आणि आदराचं प्रतीक म्हटलं आहे. या दूरध्वनी संभाषणादरम्यान, ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन तेल खरेदी थांबवण्यास आणि भारताची तेल आयात अमेरिका व व्हेनेझुएलाकडे वळवण्यास सहमती दर्शवली आहे. यामुळे युक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध थांबवण्यास मदत होईल, ज्यामध्ये रोज हजारो लोक जीव गमावत आहेत.
नरेंद्र मोदींनी मानले ट्रम्प यांचे आभार
Wonderful to speak with my dear friend President Trump today. Delighted that Made in India products will now have a reduced tariff of 18%. Big thanks to President Trump on behalf of the 1.4 billion people of India for this wonderful announcement.
When two large economies and the…
— Narendra Modi (@narendramodi) February 2, 2026
“पंतप्रधान मोदींबद्दल मैत्री आणि आदर आणि त्यांच्या विनंतीनुसार, तात्काळ प्रभावीपणे, आम्ही अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारावर सहमती दर्शविली, ज्याअंतर्गत अमेरिका टॅरिफ 25 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांपर्यंत कमी करेल. भारत देखील अमेरिकेविरुद्धचे त्याचे शुल्क आणि नॉन-टॅरिफ अडथळे शून्य करण्याच्या दिशेने वाटचाल करेल. पंतप्रधानांनी “बाय अमेरिकन” साठी देखील वचनबद्धता दर्शविली, ज्यामध्ये 500 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची यूएस ऊर्जा, तंत्रज्ञान, शेती, कोळसा आणि इतर अनेक उत्पादने आयात करणे समाविष्ट आहे. भविष्यात भारतासोबतचे आमचे अद्भुत संबंध आणखी मजबूत होतील. पंतप्रधान मोदी आणि मी असे दोन लोक आहोत जे काम करुन दाखवतात देतात, जे बहुतेक लोकांबद्दल बोललं जाऊ शकत नाही,” असंही ते म्हणाले आहेत.








