अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत तातडीने उच्च स्तरीय बैठक बोलवा, काँग्रेसचे ⁠मुख्यमंत्र्यांना पत्र

0
12
अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत तातडीने उच्च स्तरीय बैठक बोलवा, काँग्रेसचे ⁠मुख्यमंत्र्यांना पत्र


दुर्गम भागात शिक्षण, आरोग्य, लसीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये या अंगणवाडी सेविकांचं योगदान खूप मोलाचं आहे. या अंगणवाडी सेविका वेतनवाढीच्या आणि निवृत्तीवेतनाच्या मागणीसाठी ४ नोव्हेंबरपासून राज्यभर आंदोलन करत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांबाबत आपण तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावून तोडगा काढावा. तसंच गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे रोखून ठेवलेले पगारही त्यांना तातडीने द्यावेत, अशी मागणी पत्राद्वारे प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. 



Source link