‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकात अनिकेत विश्वासराव आणि पुष्कर क्षोत्रीसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

0
21
‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकात अनिकेत विश्वासराव आणि पुष्कर क्षोत्रीसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री


अभिनेत्री विषयी

आपल्या उत्तम आणि सयंत अभिनयाने डॉ. श्वेता पेंडसे हिने अनेक भूमिका सशक्तपणे पेलल्या आहेत. आता ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकासाठी तिने खाकी वर्दी चढवली आहे. नाटकाला वेगळा ट्विस्ट देण्यासाठी अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे लेडी इन्स्पेक्टर म्हणून समोर येणार आहे. या वेगळ्या भूमिकेद्वारे ती या नाटकात पुनरागमन करते आहे. खूप कमी सस्पेन्स नाटकं मनाचा ठाव घेतात, नाट्यरसिकांना गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या करत नाटाकाची रंजकता वाढावी लागते. श्वेताच्या येण्याने नाटकाला काय कलाटणी मिळणार? ती खुनाचा कट ‘परफेक्ट’ उलगडू शकेल का? हे पाहणं नाट्यरसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे.



Source link