
प्रत्येक घरात वेळेवर जेवण पोहोचवणारा डिलिव्हरी बॉय आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात कसा अपयशी ठरतो? याची कथा झ्विगॅटोमध्ये दाखवण्यात आली आहे. कपिल साकारत असलेला डिलिव्हरी बॉय एक सामान्य घरातील माणूस असून, त्याच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत. त्याचं काम थोडं अवघड आहे. रेटिंगच्या शर्यतीत हा डिलिव्हरी मॅन कुठेतरी कमी पडतो आणि इथून सुरू होते त्याच्या संघर्षाची कहाणी. या चित्रपटाचे बजेट १० कोटी रुपये आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने २५ लाख रुपयांचा बिझनेस केला. त्यानंतर चित्रपट सुपर फ्लॉप ठरला. चित्रपटाने तीन दिवसात केवळ २ कोटी ९ लाख रुपये कमावले.