Yusuf Pathan: ‘तृणमूल’चा खासदार झाल्यानंतर युसूफ पठाणला वडोदरा महापालिकेचा झटका; आधी मंजुर केलेला भूखंड परत घेणार

0
18
Yusuf Pathan: ‘तृणमूल’चा खासदार झाल्यानंतर युसूफ पठाणला वडोदरा महापालिकेचा झटका; आधी मंजुर केलेला भूखंड परत घेणार


‘तृणमूल’चा खासदार असल्याने गुजरातेतील भाजप सरकारकडून लक्ष्यः पठाण

दरम्यान, तृणमूल कॉंग्रेस पक्षाकडून निवडून आलो असल्याने राज्यातलं भाजप सरकार लक्ष्य करत असल्याचाआरोप युसूफ पठाण याने केला आहे. ‘मी नुकताच लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आलो. मी वेगळ्या पक्षातून निवडून आल्यामुळे येथे मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या १० वर्षांपासून जमिनीबाबत काहीही केले गेले नाही. आता मात्र निवडणूक निकालानंतर अचानक ६ जून रोजी नोटीस पाठवण्यात आली. जर मी त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर ते बुलडोझर घेऊन येतील’ असं युसूफ पठाण त्याच्या वकिलामार्फत न्यायालयाला सांगितले आहे. वडोदरा महापालिकेने त्याला आणि त्याच्या भावाला जमीन देण्याचे ठरवले आहे. यात हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला कोणताही अधिकार नाही, असं पठाण याने वकिलामार्फत न्यायालयाला सांगितले आहे. पठाण याचा अर्ज आल्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने वडोदरा महापालिकेकडून या प्रकरणाची माहिती मागवली आहे.



Source link