
ही कथा आहे यशोदाची म्हणजेच एका अश्या आईची आहे जिने साने गुरुजींना घडवलं, ही मालिका आपल्या मुलांवर संस्कार व्हावेत आणि आपली संस्कृती कळावी यासाठी सुरु केली होती, पण मालिकेची दुपारची ही वेळ बदलावी यासाठी अनेक पालकांचे फोन कॉल्स आणि इ मेल्स वाहिनीकडे आले. या सर्वांचा आदर राखत ८ मे पासून ही मालिका प्रेक्षकांना नवीन वेळेत म्हणजे संध्या. ६ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मालिकेची निर्मिती केली आहे पिकोलो फिल्म्स ने (वीरेन प्रधान) यांनी आधी वीरेन प्रधान यांची उंच माझा झोका ही मालिका झी मराठीवर खूप गाजली होती.






