
Happy Birthday Rocky Bhai AKA Yash: ‘रॉकिंग स्टार’ अभिनेता यश याची आता कोणतीही वेगळी ओळख सांगण्याची तशी गरज नाही. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत चाहते त्याला ‘रॉकी भाई’ या नावानेच ओळखतात. ‘केजीएफ’मुळे केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. आज जरी अभिनेता भरपूर यशस्वी दिसत असला, तरी या मागचा त्याचा प्रवास अतिशय कठीण होता. एकाछोट्याशा गावातून आज जगभरात ओळख मिळवणाऱ्या ‘केजीएफ’च्या ‘रॉकी भाई’बद्दल अर्थात अभिनेता यशबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…








