World Organ Donation Day: मृत्यूनंतर कोणता अवयव किती काळ जिवंत राहतो? जाणून घ्या

0
8
World Organ Donation Day: मृत्यूनंतर कोणता अवयव किती काळ जिवंत राहतो? जाणून घ्या


Human Body Parts: अवयवदान दिन हा दरवर्षी जागतिक पातळीवर साजरा होणारा महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्याचा उद्देश अवयवदानाबाबत जनजागृती करणे आणि अधिकाधिक लोकांना यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. संयुक्त राष्ट्र अवयव नेटवर्क (UNOS) च्या माहितीनुसार, सध्या सुमारे १ लाखांहून अधिक रुग्णांना जीवन वाचविणाऱ्या अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे. मात्र, प्रत्यक्ष देणगीदारांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे मागणी आणि उपलब्धता यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. या दिवशी लोकांनी देणगीदार होण्याचा संकल्प करावा, अशी प्रेरणा दिली जाते. तसेच, अवयवदान करून इतरांना नवी संजीवनी देणाऱ्या देणगीदारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कृतज्ञतेने सलाम केला जातो.

माणसाच्या मृत्यूनंतरही त्याच्या शरीरातील काही अवयव जिवंत राहतात, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. काही अवयव तर काही तासच नाही तर अनेक वर्षांपर्यंत कार्यक्षम राहू शकतात. कोणते आहेत हे अवयव चला जाणून घेऊयात. 

6 ते 8 तासांपर्यंत कोणता अवयव जिवंत राहतो?

व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर हृदयाची धडधड थांबते, मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा बंद होतो, तरीही काही अवयव काही काळ कार्यरत राहतात. डोळे त्यापैकी एक आहेत. मृत्यूनंतर साधारण 6 ते 8 तासांपर्यंत डोळे जिवंत राहतात. त्यामुळे जर कोणी डोळ्यांचे दान केले असेल, तर मृत्यूनंतर 6 तासांच्या आत ते काढणे आवश्यक असते.

‘हे’ अवयवही थोडा वेळ जिवंत असतात? 

डोळ्यांव्यतिरिक्त हृदय, यकृत (लिव्हर) आणि मूत्रपिंड (किडनी) मृत्यूनंतर काही वेळ कार्यरत राहतात व त्यांचे ट्रान्सप्लांट करता येते. हृदय मृत्यूनंतर साधारण 4 ते 6 तासांपर्यंत प्रत्यारोपणासाठी उपयुक्त राहते. यकृत 8 ते 12 तासांपर्यंत, तर मूत्रपिंड तब्बल 72 तासांपर्यंत कार्यक्षम राहते.

‘हे’ अवयव वर्षानुवर्षे टिकतात

मृत्यूनंतर त्वचा आणि हाडे जवळपास 5 वर्षांपर्यंत जतन करता येतात. ‘डोनेट लाइफ’ या ऑर्गन डोनेशन संस्थेनुसार, मृत्यूनंतर हार्ट व्हॉल्व (Heart Valve) तब्बल 10 वर्षांपर्यंत जिवंत ठेवता येतो आणि वापरता येतो. ही माहिती पाहून लक्षात येते की, मृत्यूनंतरही माणसाचे काही भाग इतरांच्या जिवाला नवी संजीवनी देऊ शकतात. त्यामुळे आवर्जून अवयव दान करा. 





Source link