
उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बारातमती दौऱ्यावर असून त्यांनी शरद पवारांवर राजकीय टोलेबाजी करतानाच शासकीय धोरणांवरही भाष्य केलं. राज्य सरकार चौथे महिला धोरण राबवत असून आता मुलाच्या किंवा मुलीच्या नावापुढे आईचे नाव लिहावे लागणार आहे. राज्यात चौथे महिला धोरण आणून महिलांचा सन्मान केला जाणार असून वडिलांच्या नावाआधी आता आईचे नाव लावले जाईल, असे अजित पवार म्हणाले.







