Womens Policy : नव्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा मान अजित पवारांना, बदलली नावाची पाटी

0
23
Womens Policy : नव्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा मान  अजित पवारांना, बदलली नावाची पाटी


जागतिक महिला दिनानिमित्त राज्य सरकारनं राज्याचं चौथं महिला धोरण अंमलात आणलं.  यात महिलांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसोबतच अष्टसूत्रीचा समावेश आहे. त्यामध्ये आरोग्य, पोषक आहार, शिक्षण, कौशल्य, महिला सुरक्षा, महिलांबाबतच्या हिंसाचाराच्या घटना थांबवणे, लिंग समानता, पूरक रोजगार, हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती टाळणे यामध्ये महिलांचा समावेश तसेच खेळाडूंना आर्थिक सहाय्य, सांस्कृतिक क्षेत्रात महिलांचा सहभाग याचा समावेश आहे. या धोरणामुळे समाजामध्ये स्त्री-पुरुष समानता येण्यास मदत होणार असून महिला अधिक स्वावलंबी होतील असा विश्वास महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला. 



Source link