भीमजन्मभूमी महू येथे समता सैनिक दलाच्या महिला सैनिकांची डॉ.बाबासाहेब आंबेडककारांना मानवंदना

0
7
भीमजन्मभूमी महू येथे समता सैनिक दलाच्या महिला सैनिकांची डॉ.बाबासाहेब आंबेडककारांना मानवंदना

भीमजन्मभूमी महू येथे समता सैनिक दलाच्या महिला सैनिकांची डॉ.बाबासाहेब आंबेडककारांना मानवंदना


महू(मध्यप्रदेश) : महू (डॉ.आंबेडकर नगर) या ऐतिहासिक छावणी शहराची स्थापना १८१८ मध्ये ब्रिटिश अधिकारी जॉन मॅल्कम यांनी केली. आज हे शहर भारतीय सेना आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीमुळे विशेष ओळखले जाते. त्यामुळेच या शहराला “डॉ. आंबेडकर नगर (महू)” असेही संबोधले जाते.
दरवर्षीप्रमाणे महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन मानवंदना देण्याऐवजी यावर्षी सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील समता सैनिक दलाच्या महिला सैनिकांनी आयुनि आशा रवी सोनवणे यांनी एक वेगळा उपक्रम राबवला. महाराष्ट्र राज्याचे संघटक, पुणे व सातारा जिल्ह्याचे प्रभारी तसेच समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमी असलेल्या मध्य प्रदेशातील महू येथे धम्मसहलीचे आयोजन करण्यात आले. या धम्म सहलीच्या नियोजनासाठी भारतीय बौध्द महासभा शाखा पुणे शहर चे अध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे मेजर जनरल राजरत्न थोरात यांनी सर्व महिला सैनिकांना मदत केली व धम्म सहलीसाठी शुभेच्छा दिल्या.

धम्म सहलीतील सहभागींनी सुरवातीला डॉ.बी आर आंबेडकर बौध्द विहार पंचशील नगर इंदोर येथे भंते प्रग्याशील यांच्याकडून त्रिशरण पंचशील ग्रहण केले. सर्व सहभागींनी महाराष्ट्र राज्याचे संघटक, पुणे व सातारा जिल्ह्याचे प्रभारी तसेच समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली भीमजन्मभूमी महू येथे भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाच्या सैनिकांसह उपासक व उपासिका यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. भीमजन्मभूमी महू येथील विहारात ठेवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी कलशाला वंदन करण्यात आले. यानंतर त्रिशरण, पंचशील, बुद्ध पूजा, भीमस्मरण आणि भीमस्मृती सामुदायिक पठण करण्यात आले. येथील सर्व फोटो संग्रह ही पाहण्यात आला. यावेळी आबा दणाणे यांनी वामनदादा कर्डक यांचे ‘भीमा तुझ्या महूला जाऊन काल आलो’ हे गीत गायले व इतर महिला उपासकांनी भीम गीते गाऊन वातावरण धम्ममय केले.या धम्मसहलीमुळे सहभागी सैनिकांना प्रेरणा, ऊर्जा आणि सामाजिक बांधिलकीची नवी जाणीव मिळाली. या धम्म सहलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपासक उपासिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी अमरावतीचे भारतीय महसूल सेवेतील(Indian Revenue Service-IRS) आयु.अविनाश थेटे म्हणाले,”मी बाबासाहेबांच्या कृपेमुळे इथपर्यंत आलो.जे काही आहोत ते त्यांच्यामुळेच आहे.त्यामुळे कुटुंबासह आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलो आहोत.तुमच्या सर्व धम्म कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत.

यावेळी आयु. दादासाहेब भोसले यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करून समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना आपल्या दैनंदिन जीवनात उतरविण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, धम्मसहल ही केवळ एक यात्रा नसून ती आत्मपरिवर्तन आणि समाजपरिवर्तनाची प्रेरणादायी प्रक्रिया आहे. बुद्धाच्या धम्माचा मार्ग स्वीकारून शिक्षण, संघटन आणि संघर्ष या तत्त्वांवर चालत समाजातील विषमता दूर करण्यासाठी प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे. तसेच समता सैनिक दलाच्या माध्यमातून शिस्त, संघटन आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजहितासाठी कार्य करण्याचा संदेश त्यांनी दिला.


यांनतर डॉ.बी.आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विश्वविद्यालय डॉ.आंबेडकर नगर(महू) येथे भेट दिली.या विश्वविद्यालयातील आंबेडकर स्टडी सेंटर, येथील ग्रंथालय, अत्याधुनिक सेवा, शिक्षणाच्या संधी, विविध अभ्यासक्रम व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळ्यास वंदन करण्यात आले.यावेळी ऐतिहासिक आठवण सांगणारी गंभीर नदी पहिल्या ज्याठिकाणी भीमाबाई कपडे धुण्यासाठी जायच्या ते ठिकाण पाहण्यात आले.

या सहली दरम्यान राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 18 व्या शतकात बांधलेला राजवाडा, (अहिल्या फोर्ट) कृष्णाबाई होळकर यांची छत्री-घाट व संग्रहालय पाहण्यात आली. या धम्मसहलीमुळे सहभागी सैनिकांना प्रेरणा, ऊर्जा आणि सामाजिक बांधिलकीची नवी जाणीव मिळाली.

यावेळी समता सैनिक दलाचे सैनिक आशा रवी सोनवणे, छाया विजय परिहार,नीलम बाविस्कर, आशा नितीन वन्ने, सुरेखा किशोर चव्हाण, शालन अर्जुन कांबळे, सुनीता गायकवाड, कल्पना कांबळे, शोभा भंडारे, विमल भोसले, उपासिका रेखा मनोहर कांबळे, शारदा गंगावणे, आशा कांबळे, रंजना तांबे, रंजना बगाडे, सुमल भोसले, वंदना दणाणे, अलका कांबळे, सुवर्णा गायकवाड, जगाबाई मोरे, माया मनोहर कांबळे, सुनीता धनाजी चंदनशिवे, लीलाबाई माने, मनीषा कांबळे, गौतमी रणबागले, कल्पना कांबळे, मनीषा देखणे, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व)चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, सातारा तालुक्याचे माजी अध्यक्ष आबा दणाणे, उपासक रवी कांबळे, दिनकर आनंदा मोरे यांची उपस्थित होती.यावेळी दिनकर आनंदा मोरे व उपासिका सुनिता गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करून धम्माच्या मार्गावर चालण्याचे आव्हान केले.

ही धम्म सहल यशस्वी होण्यासाठी भारतीय बौध्द महासभा इंदोर चे ईश्वर इंगळे, आयु.शांताराम वाघ, विशाल इंगळे, केंद्रीय शिक्षक व समता सैनिक दलाचे मेजर आयु.उत्तम प्रधान यांनी सर्व सहकार्य केले. सर्वांची निवासाची व्यवस्था केली.