
मुंबईतील न्हावाशेवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी घडली. मात्र, अद्यापही महिलेचा मृतदेह सापडलेला नाही. दरम्यान, भोईवाडा पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तिच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. वडिलांना राहत्या घरातून एक सुसाईड नोट सापडली, ज्यात तिने असे लिहिले आहे की, मी गेल्या आठ वर्षांपासून डिप्रेशनमध्ये आहे आणि मी अटल सेतूवरून उडी मारून माझे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये. तसेच तिला घटनास्थळी घेऊन जाणाऱ्या टॅक्सी चालकालाही जबाबदार धरू नये”, असेही सुसाईड नोटमध्ये