फरांदवाडीच्या ओढयाचे पात्र खुले करणार की भूमाफियांना पाठीशी घालणार : उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार डॉ . अभिजीत जाधव यांच्याकडे सर्वांचे लक्ष

0
13
फरांदवाडीच्या ओढयाचे पात्र खुले करणार की भूमाफियांना पाठीशी घालणार : उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार डॉ . अभिजीत जाधव यांच्याकडे सर्वांचे लक्ष

फलटण :- फरांदवाडी येथील फलटणसातारा रोड परिसराच्या लगत असणाऱ्या ओढयास जाणाऱ्या नाल्यात भराव टाकून नैसर्गिक नाला बंद केल्याची बातमी प्रसिध्द होताच महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी पंचनामा करत नकाशात ओढा पात्र दिसून येत आहे पण प्रत्यक्षात ओढा पात्र दिसून येत नसल्याची बाब पंचनामा करत नमूद केल्याने आता या प्रकरणी उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार नकाशा प्रमाणे बुजवण्यात आलेल्या ओढ्याचे पात्र खुले करणार की भूमाफियांना पाठीशी घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरा लगत असणाऱ्या शेत जमिनींना मोठी मागणी असल्याने कायदा पायदळी तुडवून लाखो रुपयांचा आर्थिक फायदा होत असल्याने सर्व नियम धाब्यावर बसवण्याचे प्रकार फलटण तालुक्यात वाढले आहेत. फरांदवाडी येथील गट क्रमांक ३९ मधून ओढ्यास मिळणाऱ्या नाला गेला होता. फरांदवाडी गावचा गाव नकाशा व गट नकाशा तसेच प्रादेशिक नियोजन आराखड्यात ही एक रेघी नाला वजा ओढ्याचे पात्र

बाणगंगा नदीस मिळत असल्याचे नकाशात स्पष्टपणे दिसत असताना कमी वेळेत पैसे कमविण्याच्या नादात नाला वजा ओढा बुजवून शेती प्लॉट तयार करून बेकायदेशररित्या विक्री करणाऱ्या भूमाफियांना महसुली हिसका दाखव्याची वेळ आली आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारी नंतर बाणगंगा नदीकडे जाणारा मुख्य नैसर्गिक नाला भराव टाकून बुजवण्यात आल्याची बातमी प्रसिध्द होताच खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाने दिनांक २४ रोजी तत्काळ घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला. यावेळी सर्व्हे नंबर ३६, ३८ व ३९ या जागेची पाहणी पंचासह केली असता महसूल विभागास नकाशात स्पष्टपणे दिसत असणारा दक्षिण उत्तर ओढा, वगळ अथवा नाला जागेवर अस्तित्वात असल्याचा दिसून आला नाही. फलटण सातारा मार्गावर एक छोटा पुल असून सदर पुला खालून पाणी येण्यासाठी अंदाजे ३० ते ४० फूट अंतरापर्यंत पाण्यासाठी मार्ग असल्याचे व पुढे ४० ते ५० फूट उपरोक्त सर्व्हे नंबर मध्ये पाण्यासाठी ओढा अगर वगळ नसल्याचे आढळून आले. याबाबत तलाठी रावसाहेब काळे यांनी पंचनामा करत नाला अगर ओढा वगळ बुजवल्याची बाब नमूद करत पंचनामा तहसिलदार अभिजित जाधव यांना सादर केला आहे.

या प्रकरणी नाला अगर ओढा वगळ बुजवल्याचा पंचनामा प्राप्त झाल्याने उपविभागीय अधिकारी अभिजित जाधव याना सादर कला आहे.

या प्रकरणी नाला अगर ओढा वगळ बुजवल्याचा पंचनामा प्राप्त झाल्याने उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार अभिजित जाधव हे फरांदवाडी गावचा गाव नकाशा व गट नकाशा तसेच प्रादेशिक नियोजन आराखड्यात ही नमूद असणारा एक रेघी नाला वजा ओढ्याचे पात्र मोजणी करून खुले करणार का? असा सवाल लगतच्या शेतकरी यांनी केला असून भूमाफियांच्या दबावापोटी ओढ्याच्या दिशेने जाणारे पाणी वाहून जाण्यास नाला खुला करून न दिल्यास पावसाळ्यात यामुळे शेती तसेच पिकांचे मोठे नुकसान यामुळे होऊ शकते.

अनधिकृत शेती प्लॉट मुळे नाला बुजवण्यात आलेला असल्याने पावसाळयात पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक पात्र नसल्याने येत्या पावसाळ्यात येथील प्रत्येक शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार अभिजित जाधव यांनी आता या प्रकरणी कडक कारवाई करत शासकिय मोजणी करून नाला पुन्हा खुला करण्याची शेतकऱ्यांची रास्त मागणी तत्काळ पूर्ण करावी. अन्यथा पुढील काळात पावसाळ्यात नाला बुजवल्याने पाणी शेतात शिरल्याने आर्थिक नुकसान झाल्यास सबंधित महसूल अधिकारी यांना जबाबदार धरून नुकसान भरपाईची दाद मागावी लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

फरांदवाडी येथील तलाठी कार्यालय संगणक चालक किरण राजाराम जाधव यास पंचनामा करताना पंच म्हणून दाखवत सही घेण्यात आल्याने सदर पंचनाम्यावर शंका उपस्थित होत आहे.

तहसिलदार यांनी स्थळपाहाणी केली असून याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातल जाणार नाही, जमीन महसूल अधिनियम मधील तरतूदी नुसार कारवाई केली जाईल सचिन ढोले उपविभागीय अधिकारी फलटण

पंचनामा व नकाशा तपासून जिथं नाला अतिक्रमण करण्यात आला आहे ते अतिक्रमण खुल केल जाईल जिथ जिथ अतिक्रमण करून नाला बुजवून टाकण्यात आला आहे तो नियमांनुसार खुला करावाच लागेल डॉ अभिजित जाधव तहसिलदार फलटण