
फलटण : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण तालुक्यात आभार दौरा सुरु केला आहे . लोकसभा निवडणूकीत अथक परिश्रम करणारे तसेच सर्वच जनतेचे मनापासून आभारी असून येणाऱ्या काळात फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे पश्न सोडवण्यासाठी पूर्णवेळ कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट संकेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले . त्यांनी अनेक कार्यकर्त्याच्या घरी जावून भेटी घेतल्या . यावेळी अनेक कार्यकर्ते भाऊक झाल्याचे पाहण्यास मिळाले
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली . या झालेल्या निवडणूकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभव झाला . परंतू या पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा फलटण शहर व तालुक्यातील जनतेचे आभार मानण्यासाठी आभार दौरा सुरू केला आहे जनतेने दिलेले भरभरून प्रेम आणि सन्मान मतांच्या माध्यमातून आपल्याला दिला आहे . याचे मी सदैव ऋण आपल्यावर असणारच आहे , असे म्हणत लवकरच आपण संपूर्ण तालुक्यातील तमाम जनतशी संवाद साधणार असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले .
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून मला तब्बल 17000 मतांचे मताधिक्य आहे. फलटणचा सुपुत्र म्हणून फलटण तालुक्यातील जनतेने माझ्यावर जे प्रेम केलेले आहे; ते कधीही विसरणार नाही. आगामी काळात फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी पूर्णवेळ कार्यरत राहणार आहे. फलटण तालुक्यामधील प्रत्येक वाडीवस्तीवर जाऊन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक नवीन फळी तयार करणार आहे. यासाठीच आगामी काळात मी कार्यरत राहणार असल्याचे रणजितसिंह यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, फलटण ता. प्रभारी विश्वासराव भोसले, गटनेते अशोक जाधव जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, युवानेते रणजितसिंह भोसले, जिल्हा चिटणीस बाळासाहेब कदम, पुर्व मंडल अध्यक्ष बजरंग गावडे, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते, शहराध्यक्ष अनुप शहा, नगरसेवक अजय माळवे, सुधीर अहिवळे, सचिन अहिवळे, महिला अध्यक्ष ऊषा राऊत संदिप चोरमले, अॅङ नरसिंह निकम, प्रसाद पाटील, देवा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.







