
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेशसिंग राजदत्ता व पत्नी मंगला यांच्या मजुरीच्या पैशावरून वाद सुरू होता. याच वादातून राजेशने पत्नी मंगलला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तिचं डोकं जमिनीवर आपटलं. यातच मंगलाचा मृत्यू झाला.याप्रकरणी पुलगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून. पोलिसांनी राजेशसिंगला दखनी फैल परिसरातून अटक केली.






