
Indian railway google translate viral news : भाषांतर करतांना अनेक वेळा गुगल ट्रान्सलेटची मदत घेतली जाते. मात्र, हे भाषांतर तंतोतंत होत नसल्याने अनेकदा शब्दाचा अर्थ बदलून अनर्थ होतो. हा अनर्थ भारतीय रेल्वे सोबत घडल्याची एक घटना पुढे आली आहे. ही घटना भारतीय रेल्वे सोबत झाली आहे. रेल्वेने गूगल ट्रान्सलेट वापरुन एका एक्सप्रेस रेल्वेचे नाव बदलले. मात्र, गुगल ट्रान्सलेट झालेल्या शब्दाचा अर्थ अधिकाऱ्यांना न समजल्याने प्रवासी मात्र, चांगलेच भडकले आहेत. बदललेल्या शब्दाचा अर्थ मर्डर ट्रेन असा झाला असून हे नाव देखील गाडीवर लावल्यात आले आहे. हे नाव वाचून प्रवासी मात्र भडकले आहे. दरम्यान, रेल्वेने झालेली चूक मान्य करून सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे.








