
यावेळी ‘केदारनाथ’ फेम अभिनेत्री सारा अली खान कॅज्युअल लूकमध्ये दिसली. केशरी रंगाचा टॉप आणि ब्लॅक पँटमध्ये सारा अली खानचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सारा अली खानने मंदिराच्या प्रांगणाबाहेर बसलेल्या गरजू लोकांना अन्न वाटप करण्याची ही पद्धत चाहत्यांना आवडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत अभिनेत्रीचे कौतुक केले आहे.






