
नुकताच अंकिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री रागाने लालबुंद होऊन पॅप्सवर जोरात ओरडताना दिसत आहे. नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अंकिता मीडियाशी अत्यंत रागाने बोलत असल्याचे दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये पापाराझींवर ओरडत अंकिता म्हणते की, ‘आत फिल्म चालू आहे, चला आधी बाहेर व्हा… बाहेर व्हा… हे बरोबर नाही… यार, हे खरंच अति झालं नाही का? आत फिल्म चालू आहे, जरा धीर धरा मित्रांनो, काय सुरू आहे हे?’ यानंतर अंकिता आत जाते. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच नेटिझन्सनी त्यावर प्रतिक्रिया देत, अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत.






