
कोण आहे किलर माइक?
किलर माइक हा अमेरिकेतील अतिशय प्रसिद्ध रॅपर आहे. ४७ वर्षीय माइकने जवळपास दोन वर्षांपूर्वीच रॅप लिहिण्यास सुरुवात केली होती. त्याच्या गाण्यांना प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसाद मिळाला. त्याची ‘सायंटिस्ट्स अँड इंजिनीअर्स’,‘मायकल’, ‘द होल वर्ल्ड’ ही गाणी तुफान हिट ठरली होती. यंदा ग्रामी पुरस्कारात त्याला या तीनही गाण्यांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या बाचाबाचीमध्ये माइकविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.








