
‘छावा’मध्ये विकी साकारणार मुख्य भूमिका!
अभिनेता विकी कौशल नुकताच ‘सॅम बहादूर’ या चित्रपटामध्ये दिसला होता. या चित्रपटातील विकी कौशल याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. आता विकी कौशल ‘छावा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच, विकीने इंस्टाग्रामवर पडद्यामागील त्याच्या पुढच्या प्रोजेक्ट ‘छावा’ची झलक शेअर केली आहे. ‘छावा’ हे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट असणार आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार असून, रश्मिका मंदाना ‘येसूबाई भोसले’ यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि नील भूपालम यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘छावा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली, तरी चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.








