
राखीचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेक युजर्स तिच्यावर टीका करत आहेत. या व्हिडीओवर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यात एका युझरने लिहिले की, ‘ही अशिक्षित महिला रमझानची थट्टा करत आहे.’ दुसऱ्या एका युझरने लिहिले की, ‘किमान रमजानचा तरी आदर करा, राखी… कृपया आमची अशी चेष्टा करू नका.’ आणखीएकाने लिहिले की, ‘हाकाय मूर्खपणा आहे. तिने जरइस्लाम स्वीकारला असेल, तरहे असे वागणे चालणार नाही.’ राखीच्या या व्हिडीओवर अशा अनेक कमेंट येत आहेत.






