Viral Video : ‘भाभी कैसे हो?’ विचारताच लाजली निक्की तांबोळी! अरबाज पटेलसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार?

0
15
Viral Video : ‘भाभी कैसे हो?’ विचारताच लाजली निक्की तांबोळी! अरबाज पटेलसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार?


Nikki Tamboli-Arbaaz Patel Viral Video : अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या प्रचंड चर्चेत आहे. निक्की तांबोळी ‘बिग बॉस ‘, ‘बिग बॉस ५’ आणि ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ११’मध्ये देखील दिसली आहे. निक्की ‘बिग बॉस मराठी ५’मुळे खूपच चर्चेत आली होती. या शोमध्ये निक्कीने केवळ तिच्या खेळानेच नव्हे, तर तिच्या लूकनेही सर्वांची मने जिंकली. सध्या निक्की तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे देखील चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी ५’चा स्पर्धक अरबाज पटेलसोबत तिचे नाव चर्चेत आले आहे. दोघेही डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. दरम्यान, निक्की आणि अरबाजचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.



Source link