
Viral News: शॉर्ट्स घातल्यामुळे नोकरीच्या मुलाखतीतून घरी पाठवण्यात आल्याचा दावा एका महिलेने केला आहे. तिचा पोशाख रिक्रूटरने अनप्रोफेशनल ठरवला होता, पण टायरशिया नावाच्या नोकरी शोधणाऱ्या महिलेने आपल्या कपड्यांबाबत स्वत:चे मत मांडले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. टिकटॉकवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये टायरशियाने जॉब इंटरव्ह्यूला काळे शॉर्ट्स घालून आपण काहीही चुकीचे केले नसल्याचे ठामपणे सांगितले.