
हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. ‘आवश्यक ती कारवाई करा आणि गरज पडल्यास त्या महिलेवर गुन्हा दाखल करा,’ असे एका एक्स युजरने लिहिले आहे. पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी आणखी एकाने केली आहे. ‘आजकाल ही फॅशन बनली आहे. ड्युटीवर असलेल्या पोलिसावर हल्ला करण्याचे धाडस ती कशी करू शकते, तेही चुकीच्या बाजूने गाडी चालवताना? कृपया संबंधित चालकावर कडक कारवाई करा,’ असे तिसऱ्याने लिहिली आहे.








