
अलायाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अलायासोबत मानुषी शाहरुख खान-प्रीती झिंटा-सैफ अली खान यांच्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटातील ‘इट्स अ टाइम टू डिस्को’ या प्रसिद्ध गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अलाया एफ आणि मानुषीसोबत चित्रपटाची संपूर्ण टीम डान्स करताना दिसत आहे. या डान्सचा व्हिडीओ शेअर करत असताना अलाया एफने लिहिले की, ‘तुम्ही सेटवर बोलावण्याची वाट पाहत आहात, पण आय डिस्कोची वेळ आली आहे.’