
व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक रेल्वे ट्रॅकवर जेवण बनवत आहेत. तसेच लहान मुले इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. तर, काही लोक चक्क रेल्वे ट्रॅकवर झोपल्याचे दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने त्वरीत घटनास्थळ गाठून परिसर साफ केला. काही लोक ट्रॅकवर त्यांचे कपडे वाळवताना दिसले, ज्यामुळे ते लोक रेल्वे ट्र्रॅकवरच राहत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.







