
एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्री गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते म्हणून नाना पाटेकर ओळखले जातात. नानांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये काम केले आहे. आता लवकरच नानांचा वनवास हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ते नवख्या कलाकारांसोबत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. दरम्यान, सोशल मीडियावर नानांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नानांनी केलेल्या कृत्याने सर्वांची मने जिंकली आहेत.








