
तिने अलेक्साला (डिव्हाइस) कुत्र्याचा आवाज काढण्यास सांगितले. अलेक्साला व्हॉईस कमांड मिळताच ती कुत्र्यासारखा जोरजोरात भुंकण्याचा आवाज करू लागली. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकताच माकडे तिथून पळून गेली.
जगात तंत्रज्ञानाचा व्याप्ती ज्या वेगाने विस्तारित आहे, त्याचा फायदाही लोकं आपआपल्या परीने घेत आहेत. या तंत्राज्ञानाचा वापर करून आज अनेक अवघड वाटणरी कित्येक कामं आपण सहज करतो. याचं तंत्रज्ञानाच्या मदतीनं 13 वर्षांच्या एका मुलीनं एका चिमुकलीचा जीव वाचवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीनं प्रसंगावधान राखत अलेक्साच्या (Alexa) मदतीनं माकडांच्या होणाऱ्या हल्ल्यापासून (monkey attack) या मुलीनं न केवळ आपला तर चिमुकलीचा जीव वाचवल्यामुळे सगळीकडे तिचं कौतुक होत आहे.
हे सुद्धा वाचा
नेमका प्रकार काय
उत्तर प्रदेशच्या बस्ती येथे हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉलनीत राहणारी 13 वर्षाची निकिता तिची १५ महिन्यांची भाची वामिका हिच्यासोबत घरात खेळत होती. दोघीही घराच्या पहिल्या मजल्यावर किचनजवळ खेळत होत्या. त्यावेळी या दोघींशिवाय घरी कोणीही नव्हते. तेवढ्यात माकडांच्या टोळक्याने घरात प्रवेश केला आणि स्वयंपाकघरात जाऊन भांडी आणि खाद्यपदार्थ उचलून फेकून दिले.










