
AI answer on kidney stone : जगात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. सांगणकाच्या आणि इंटरनेटच्या युगात आता एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्चस्व आहे. या एआयने अनेकांची कामे सोपी केली आहे. अनेक ॲप्स आणि सॉफ्टवेअरद्वारे, लोक एआय तंत्रज्ञानाचा वापर करून फोटोंपासून कंटेंटपर्यंत आयत्या गोष्टी तयार करत आहे. या सर्वांसाठी एआयची मदत घेतली जाते. मात्र, एकाने गूगल एआयला असे काही विचारले की मिळालेल्या उत्तरामुळे सर्वांना धक्का बसला आहे. गुगलच्या सर्च जनरेटिव्ह एक्सपिरियन्समध्येही ही घटना घडली आहे. एका व्यक्तीने किडनी स्टोन झाल्यास काय करावे या बाबत गूगल एआयद्वारे माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जे उत्तर गूगलने दिले यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले आहे. तंत्रज्ञानाच्या जगात या उत्तराने गुगलचीही बदनामी होत आहे.








