Viral News : वडिलांना साप चावल्याने मृत्यू! मुलीचे त्यांना जिवंत करण्यासाठी भर रुग्णालयात सुरू केले मंत्र पठण

0
16
Viral News : वडिलांना साप चावल्याने मृत्यू! मुलीचे त्यांना जिवंत करण्यासाठी भर रुग्णालयात सुरू केले मंत्र पठण


Viral News : झारखंडमध्ये एका व्यक्तीला साप चावला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र दवाखान्यात जात असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मात्र, त्याच्या मृत्यूवर कुटुंबीयांचा विश्वास नअसल्याने त्यांनी त्या व्यक्तीचा मृतदेह अनेक रुग्णालयात नेला, मात्र सर्वत्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांना संगितले. दरम्यान, मृताच्या मुलीने वडिलांना जिवंत करण्यासाठी रुग्णालयात मंत्रोच्चार सुरू केले. मुलीला मंत्रोच्चार करताना पाहून हॉस्पिटलमध्ये लोकांची गर्दी जमा झाली. डॉक्टरांनी तिच्या वडिलांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास सांगितले. मात्र, तिने नकार दिला. वडीलांचा मृतदेह घरी घेऊन हनुमान मंदिरात ठेवला तर ते परत जीवंत होतील अशी धारणा मुलीची होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिस देखील रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी मुलीची समजूत काढली आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. ही घटना झारखंड राज्यातील गढवा जिल्ह्यातील घडली.



Source link