
buffalo swallows mangalsutra in washim : जनावरांनी एखादी मौल्यवान वस्तू गिळल्याच्या बातम्या गाव-खेड्यांत वरचेवर ऐकायला मिळतात. छोटी-मोठी वस्तू असेल तर त्यावर पाणी सोडलं जातं, पण एखादी मौल्यवान वस्तू असेल तर संबंधितांची मोठीच पंचाईत होऊन जाते. त्यातून एखादा अनाकलनीय निर्णय घेतला जातो. वाशिम जिल्ह्यात अशीच काहीशी घटना घडली आहे. इथल्या एका शेतकऱ्याच्या घरातील म्हशीनं दीड लाखांचं मंगळसूत्र गिळलं. त्यानंतर जे घडलं ते चकीत करून टाकणारं आहे.





