
त्याच्या ‘सुपर साइज मी’ या माहितीपटात त्याने ३० दिवस दररोज दिवसातून तीन वेळा मॅकडोनाल्डचे जेवण खाल्ले. या खान्यामुळे परंतु जे परिणाम समोर आले ते खूपच धक्कादायक होते. नियमांचे पालन करून, स्परलॉकने कमीतकमी एकदा मॅकडोनाल्डच्या मेनूमधून किमान एक जेवण खाल्ले. अवघ्या पाच दिवसांनंतर त्याचे वजन ९.५ पौंडांनी वाढले आणि नंतर २१ दिवसांनी त्याचे एकूण २४.५ पौंड झाले होए. याशिवाय त्याच्या शरीरातील चरबीही ११ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढली होती, तर कोलेस्टेरॉलची पातळी १६८ वरून २४० झाली.








