
Dowry in beggars Viral News : हुंडा घेणे कायद्याने गुन्हा आहे. लग्न करतांना हुंड्याची मागणी केली जाते. यात पैसा, गाडी, जमिन, दागिने काहीही मागितले जाते. ही कुप्रथा फक्त श्रीमंत, मध्यम वर्गातच नाही तर भिकाऱ्यांमध्येही आहे. भिकारी हुंड्यात जे घेतात ती यादी पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. लखनौ शहरात भिकाऱ्यांचे लग्न ठरतांना हुंड्यात भीक मागण्यासाठी मंदिरे, चौक या सारखी ठिकाणे दिली जातात. पूर्वी हुंड्यात चित्रपटगृहांना प्राधान्य दिले जात असे. आता महिला रुग्णालये, उद्याने व मोठे चौक हुंड्याच्या मागणीच्या यादीत पहिल्या तीनमध्ये आहेत.