Video | ‘पंतप्रधान मोदी ‘ओबीसी’ म्हणून जन्मले नाहीत’, राहुल गांधींनी थेट जातीचा उल्लेख केल्याचा व्हिडीओ व्हायरल | Navarashtra (नवराष्ट्र)

0
22
Video | ‘पंतप्रधान मोदी ‘ओबीसी’ म्हणून जन्मले नाहीत’, राहुल गांधींनी थेट जातीचा उल्लेख केल्याचा व्हिडीओ व्हायरल | Navarashtra (नवराष्ट्र)


Rahul Gandhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद सभागृहात स्वतःच्या जातीबद्दल खोटे सांगितले, असा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. ते खुल्या प्रवर्गातील असून ओबीसी प्रवर्गाशी त्यांचा संबंध नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

Rahul Gandhi on PM Modi : पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पीय अधिवेश भाषणादरम्यान काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडत असताना, आपण स्वतः सर्वात मोठा ओबीसी नेता असल्याचे म्हटले होते. या खुलाश्यातून जातनिहाय जनगणना आणि ओबीसीवरून काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेला मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या विषयात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीचा उल्लेख केला आहे. गुरुवारी ‘भारत जोडो न्याय यात्रेत बोलत असताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या जातीबद्दल चुकीची माहिती पसरवली. पंतप्रधान खुल्या प्रवर्गातील आहेत., ओबीसी प्रवर्गाशी त्यांचा काहीही संबंध नाही.

पंतप्रधान मोदींच्या जातीचा थेट उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी प्रवर्गातील जातीत जन्मलेले नाहीत. त्यांचा जन्म गुजरातच्या ‘तेली’ जातीत झाला आहे, अशी माहिती राहुल गांधी यांनी ओडिशा येथील झरसूगुडा येथे बोलताना दिली. या जातीला ओबीसी भाजपाने २००० साली ओबीसी प्रवर्गात टाकले. त्याआधी तेली जात खुल्या प्रवर्गात होती, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.





Source link