
नागेश तरडे असे या जखमी तरुणाचे नाव असून, तो या चित्रपटात एका छोट्याशा भूमिकेत झळकणार आहे. मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’चे चित्रीकरण सध्या किल्ले पन्हाळगडावर शूटिंग सुरू आहे. शूटिंग संपल्यानंतर नागेश हा तरुण मावळ्याच्या वेशात स्वतःचे फोटो काढून घेत होता. यावेळी तो फोटो काढण्यासाठी सज्जा कोठीच्या तटबंदीवर चढला. मात्र, फोटो काढत असतानाच पाय घसरून तो दरीत पडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आहे.