Vasant More: मर्यादेबाहेर त्रास सहन केला! आता ना तक्रार ना अपेक्षा; मध्यरात्री पोस्ट लिहीत वसंत मोरेंनी व्यक्त केली खदखद

0
27
Vasant More: मर्यादेबाहेर त्रास सहन केला! आता ना तक्रार ना अपेक्षा; मध्यरात्री पोस्ट लिहीत वसंत मोरेंनी व्यक्त केली खदखद


Vasant More Facebook Post : पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. मोरे हे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, पक्षाने या बाबत अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. वसंत मोरे हे अनेकदा सोशल मिडियावरून व्यक्त होत असतात. दरम्यान, मध्यरात्री वसंत मोरे यांनी लिहिलेली फेसबूक पोस्ट सध्या चर्चेत आहे. एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो, आता आपली कुणाकडूनही काहीही अपेक्षा नाही असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टमुळे सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.



Source link