
वनिताच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या पहिल्या मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या चित्रपटाचे नाव ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ असे आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलरमधील वनिताचा लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली.