
कोल्हापूरहून मुंबई मार्गावर धावणाऱ्या नवीन महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रेनला दानवेंनी व्हर्चुअल पद्धतीने मुंबईतून हिरवा झेंडा दाखवून रवाना केली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, संजय मंडलिक आदि उपस्थित होते. यावेळी दानवे यांनी आश्वासन दिले की, दोन महिन्याच्या आत कोल्हापूरला वंदे भारत ट्रेनची भेट दिली जाईल.






