Uttarkashi Tunnel Rescue : उत्तर काशीत बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांचा व्हिडिओ पहिल्यांदाच आला समोर, पाहा आतील स्थिती

0
11
Uttarkashi Tunnel Rescue : उत्तर काशीत बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांचा व्हिडिओ पहिल्यांदाच आला समोर, पाहा आतील स्थिती


Uttarkashi Tunnel Rescue mission video : उत्तरकाशीच्या सिल्क्य बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांसाठी ६ इंची पाइपलाइन नवीन जीवनवाहिनी बनली आहे. या पाईपद्वारे प्रथमच मजुरांना गरम अन्न पाठवण्यात आले आहे. आज त्यांना बचाव पथकाने खिचडी पाठवली. दरम्यान, आत अडकलेल्या मजुरांचा पहिला व्हिडिओ आणि फोटो देखील पुढे आली आहे. यात हे सर्व मजूर सुरक्षित असल्याचे दिसत असून बाहेर निघण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. बचाव पथक त्यांच्याशी वॉकी टॉकी वरुन संपर्क साधत असून त्यांना धीर देतांना दिसत आहे. तसेच त्यांना लवकरच बाहेर काढण्यात येणार असल्याचे देखील सांगताना दिसत आहे.



Source link