Unlock Zindagi: लॉकडाउन काळातील भयाण वास्तव सांगणाऱ्या ‘अनलॉक जिंदगी’चा ट्रेलर प्रदर्शित

0
11
Unlock Zindagi: लॉकडाउन काळातील भयाण वास्तव सांगणाऱ्या ‘अनलॉक जिंदगी’चा ट्रेलर प्रदर्शित


दोन वर्षांपूर्वी साऱ्या जगावर एक मोठे संकट आले, कोरोना महामारीचे. अवघ्या काही दिवसांतच या महामारीने जगभर हाहाकार माजवला. कोरोनाच्या विळख्यात आपण असे अडकलो की, संपूर्ण जग ठप्प झाले. शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, उद्योगधंदे, मंदिरे, दळणवळणाची साधने. संपूर्ण जगच थांबले. निर्मनुष्य रस्ते पाहून जीव घाबराघुबरा व्हायचा. लोकांचे एकमेकांना भेटणे थांबले. या महामारीत कित्येकांनी आपले प्राण गमावले, अनेकांचे भावनिक, आर्थिक, अशा सगळ्याच बाजूने नुकसानही झाले. आजही हे भयाण वास्तव आठवले, की अंगावर काटा येतो. लॉकडाऊनमधील ही परिस्थिती लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.



Source link