Union Budget : तुम्हावर केली मर्जी बहाल… बिहार आणि आंध्र प्रदेशला केंद्र सरकारनं केलं मालामाल

0
18
Union Budget : तुम्हावर केली मर्जी बहाल… बिहार आणि आंध्र प्रदेशला केंद्र सरकारनं केलं मालामाल


आंध्र प्रदेशला १५ हजार कोटी रुपयांचे स्पेशल पॅकेज

अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांनी आंध्र प्रदेश १५ हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. याशिवाय आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यांतर्गत राज्याला अतिरिक्त रक्कमही दिली जाणार आहे. आंध्रमधील बहुप्रतिक्षित पोलावरम प्रकल्पासाठीही अर्थमंत्र्यांनी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. आंध्रमधील महत्वाचा प्रकल्प पोलोवरम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. यामुळे देशातील अन्नधान्याची टंचाईही कमी होईल. राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी पाणी, वीज, रेल्वे, रस्ते यासाठी निधी दिला जाणार आहे. रायलसीमा, प्रकाशम आणि कोस्टल आंध्रचा विकास करण्यासाठी मदत केली जाईल. विशाखापट्टणम चेन्नई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणि हैदराबाद-बेंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडॉरमधील ओरावकल भागातील विकासासाठी निधीची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. आंध्रला एकूण ५० हजार कोटी रुपयांचा थेट फायदा होणार आहे. आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यांतर्गत औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने पाणी, वीज, रेल्वे आणि रस्ते यासारख्या आवश्यक पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.



Source link