नष्टप्राय होत जाणारी पळसदरी कर्जत येथील अपरिचित वर्णे लेणी

0
13
नष्टप्राय होत जाणारी पळसदरी कर्जत येथील अपरिचित वर्णे लेणी

महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका हा सह्याद्रीच्या सहवासाने संपूर्ण वेढलेला आहे. याच कर्जतमध्ये विविध घाटमार्ग उतरले असून ते कर्जत जवळील असलेल्या प्राचीन सोपारा, कल्याण, उरण तसेच चौल बंदरांशी व्यापारीदृष्ट्या जोडलेले आहेत. या घाटवाटांच्या साह्याने कोकण व देश यांमध्ये वाहतूक अथवा व्यापार होत असे. या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी घाटमाथ्यावर किल्ल्यांची निर्मिती झाली. यामध्ये; कर्जत मध्ये उतरणारे बोरघाट, ढाक बहिरी ते कोथळीगड यामधील कुसुर घाट, कोथळीगड ते पदरगड मधील वाजंत्री घाट, भीमाशंकर येथील प्रसिध्द शिडी घाट तसेच गणेश घाट इ. होय. ह्या सर्व प्राचीन घाटवाटा सातवाहनांची आर्थिक राजधानी असलेल्या जुन्नर व पुढे पैठण, तेर या व्यापारीदृष्ट्या प्रगत शहरांना जोडण्प्रया होत्या. बोरघाट रायगड जिल्ह्यात जिथे उतरतो तिथे कर्जतजवळ; पळसदरी हे ठिकाण असून या पळसदरी लोहमार्ग स्थानकापासून २.९ किमी अंतरावर वर्णे हे कर्जत- खोपोली ह मार्गावरील गाव आहे. या गावाच्या मागे असलेल्या टेकडीवजाडोंगराच्या मध्यावर त (अक्षांश १७.२९०३३२, रेखांश ७६.२८९०६३)

एक अपरिचित लेणी आहे. या लेण्यांच्या वरून पावसाळ्यात मोठा धबधबा कोसळतो. त्यामुळे लेण्यांची झीज व पडझड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या लेण्यांच्या पायथ्याला एक वैशिष्ट्येपूर्ण पाण्याचे टाके असून त्याची रचना वर्तुळाकार आहे. वर्णे येथे क्र.१,२,३ व ५ हे पाहताक्षणी भिक्खूनिवास असलेले दिसून येतात. क्र. ३ व ५ मधील जागा विहार की पाण्याचे टाके ? यामध्ये संभ्रम आहे. वर्णे लेणी ही प्राचीन बोरघाट उतारावर असून कर्जतजवळील सोपारा, कल्याण, चौल तसेच उरण या बंदरांशी जोडणाऱ्या मार्गावर स्थित आहे.

या समूहातील प्रथम लेणं हे भिक्खूनिवास स्वरूपातील दुहेरी रचना असलेले विहार असून यामध्ये ६ X ६ फूट रुंदीचे बाहेरील दालन व आतमध्ये सुमारे २ ते ३ फूट लांबीची आतील भिक्खूनिवास आहे. यामध्ये दगडी बाकाचे भग्न अवशेष असलेले दिसून येतात. हा दगडी बाक २.५ फूट रुंद २ फूट उंचीचा आहे. आतील दालनाच्या दरवाजा बसवण्याची जागा ही २.३ फूट इतकी रुंद आहे. या विहाराची उंची सध्या गाळ साचलेला असल्यामुळे गाळाच्या थरापासून

छतापर्यंत ६.५ फूट इतकी आहे. समूहात असलेल्या इतर लेण्यांपेक्षा सदर विहार हे त्यामानाने चांगल्या स्थितीत असलेले व आकारमानाने मोठे (अंदाजे ९ फूट लांब ) आहे. दुसरे लेणं हे विहार असून त्याचे आकारमान ६.५ x ६.५ फूट लांबी रुंदी असलेले असून गाळाच्या थरापासून छतापर्यंत चे अंतर ६.११ म्हणजे अंदाजे ७ फूट उंच आहे. या विहाराला दरवाजा बसवण्याची व्यवस्था केली असलेली दिसून येते. छताकढील बाह्यबाजूस २.३ फूट रुंद प्रवेशद्वार रचना दिसून येते. यामध्ये समोरील दगडी बाकाचे अवशेष असलेले दिसून येतात परंतु; आता केवळ त्याच्या खुणा शिल्लक आहेत. दगडी आसन संपूर्णत: नष्ट झाले आहे.

तिसरे लेणे हे सुद्धा दुसऱ्या विहाराशी साधर्म्य असलेले असून त्याचे आकारमान सुद्धा ६.५ x ६.५ फूट लांबी रुंदी असलेले असून गाळाच्या थरापासून छतापर्यंत चे अंतर ६.११ म्हणजे अंदाजे ७ फूट उंच आहे. या विहारालासुद्धा दरवाजा बसवण्याची व्यवस्था केली असलेली दिसून येते. छताकढील बाह्यबाजूस २.३ फूट रुंद प्रवेशद्वार रचना दिसून येते. यामध्ये समोरील दगडी बाकाचे केवळ खुणा शिल्लक आहेत. दगडी आसन संपूर्णतः नष्ट झाले आहे. क्रमांक ३ च्या विहार लेण्यांच्या शेजारी असलेले अपूर्ण अवस्थेतील विहार 2 की याचे के 2 आहे त्यामानाने चांगल्या स्थितीत असलेले व आकारमानाने मोठे (अंदाजे ९ फूट लांब ) आहे. दुसरे लेणं हे विहार असून त्याचे आकारमान ६.५ x ६.५ फूट लांबी रुंदी असलेले असून गाळाच्या थरापासून छतापर्यंत चे अंतर ६.११ – म्हणजे अंदाजे ७ फूट उंच आहे. या विहाराला दरवाजा बसवण्याची व्यवस्था केली असलेली दिसून येते. छताकढील बाह्यबाजूस २.३ फूट रुंद प्रवेशद्वार रचना दिसून येते. यामध्ये समोरील दगडी बाकाचे अवशेष असलेले दिसून येतात परंतु; आता केवळ त्याच्या खुणा शिल्लक – आहेत. दगडी आसन संपूर्णतः नष्ट झाले आहे. क्रमांक ३ च्या विहार लेण्यांच्या शेजारी असलेले अपूर्ण अस अवस्थेतील विहार ? की पाण्याचे टाके ? आहे. का यामध्ये संभ्रम असलेला दिसून येतो. कारण विद्व येथील रचना आधीच्या तिनही विहारांपेशा रुंदीने प्र ट मोठी असलेली दिसून येते. तसेच छताकढील ल भाग हा कोरीव नाही. परंतु; येथील तळाकडील न. बाजूस मोठ्या प्रमाणावर गाळ व दगडधोंड्यांचा ३ थर साचला आहे. यामुळे; ही रचना अपूर्ण विहार र्ण असलेली आहे की पाण्याचे टाके; ते यातील गाळ है. काढल्यानंतरच निश्चित होईल. वरील सर्व ि ण विहारांपासून थोडेसे विलग असलेले व प्रथमदर्शनी ओळखता न येणारे, संपूर्ण गाळाने इत न भरलेले पाचवी रचना ही एक विहार असलेले न दिसून येते. हे विहार ७ × ७ फूट लांबी रूंद असून यामध्ये संपूर्ण गाळ साचला असल्याकारणाने याची उंची मोजता येणे शक्य पा उ नाही. आतमध्ये तीनही दिशेला कोरलेल्या सपाट रेस भिंती दृष्टीस पडतात. याच्या बाहेरील बाजूस रच् व प्रवेशद्वार रचना असून त्याची रुंदी ही २.४ फूट व अभ्यासकांच्या नजरेपासून दुर्लक्षित आहे. या लेणीबद्दल उल्लेख अथवा माहिती अगोदरच्या लिखाणात मिळत नाही म्हणूनच; या लेणीची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे हा निव्वळ शुद्ध हेतूने उपरोक्त लेखकाने वर्णे लेणीवर शोधनिबंध लिहिला असून वर्णे लेणीबद्दल विस्तृत उहापोह केला आहे.

रोहित राजेंद्र भोसले