Umbrella: लग्न करेन तर अभीशीच; बहुचर्चित ‘अंब्रेला’ चित्रपटाचा रोमांच ट्रेलर प्रदर्शित

0
23
Umbrella: लग्न करेन तर अभीशीच; बहुचर्चित ‘अंब्रेला’ चित्रपटाचा रोमांच ट्रेलर प्रदर्शित


स्वत: मनोज विशेंनीच पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाचा नावाइतकाच दिलखेचक ट्रेलर नुकताच लाँच झाला. ट्रेलरला प्रेक्षकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणार यात शंकाच नाही! कारण चित्रपटात एका आगळ्यावेगळ्या प्रेमकथेला कौटुंबिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून हाताळण्याची वेगळी शैली दिसणार आहे. हा चित्रपट त्याच्या ट्रेलरप्रमाणेच प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरलाय तो त्याच्या गाण्यांमुळे! अजय गोगावले, सुनिधी चौहान, केके. आनंद शिंदे, नकाश अजीज, भारती माधवी अशा एकाहून एक सुरेल आणि मनात रुंजी घालणारे आवाज या गाण्यांना लाभले आहेत.



Source link