
रशियातील एका तरुणाने काही दिवसांपूर्वी आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली होती. पीडित तरुणीने ब्रेकअप केल्याने आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला आणि तब्बल साडेतीन तास तिचा अमानवी छळ केला. नराधम तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने धारदार शस्त्राने १११ वेळा वार करत तरुणीचा जीव घेतला.
मॉस्को : रशियातील एका तरुणाने काही दिवसांपूर्वी आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली होती. पीडित तरुणीने ब्रेकअप केल्याने आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला आणि तब्बल साडेतीन तास तिचा अमानवी छळ केला. नराधम तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने धारदार शस्त्राने १११ वेळा वार करत तरुणीचा जीव घेतला. १७ वर्षांची शिक्षा झालेल्या या क्रूर मारेकऱ्याची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सुटका केली आहे.
संबंधित दोषी आढळलेल्या तरुणाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्याला माफी दिली आहे. क्लादिस्लाव कान्युस असं मारेकऱ्याचं नाव असून, त्याला रशियातील न्यायालयाने १७ वर्षांची शिक्षा सुनावली होती. एक वर्षांहून कमी काळ तुरुंगात राहिल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली आहे.









