
मोनिकाने पीहू आणि स्वराचे डीएनए रिपोर्ट बदलल्यामुळे हा सगळा घोळ झाला आहे. शुभंकरची मुलगी स्वरा नसून, पीहू आहे. शुभंकर ठाकूर हा मोनिकाचा बॉयफ्रेंड होता. मोनिकाला त्यांच्यापासून दिवस गेले होते. मात्र, मोनिकाच्या वडिलांना याची कुणकुण लागताच त्यांनी मोनिकाचं लग्न मल्हारशी लावून दिलं होतं. मल्हारला देखील एका अटीमुळे मोनिकाशी लग्न करावं लागलं होतं. मात्र, नंतर त्याने मोनिकाला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं. परंतु, मोनिकाने पीहूचं सत्य नेहमीच मल्हारपासून लपवून ठेवलं. शुभंकर परतून आल्यामुळे आता मोनिकाला मोठा धक्का बसला आहे.






