
जर, स्वरा माझ्यापासून दुरावली तर, पीहूला देखील तुझ्यापासून दूर जाईल, अशी धमकी शुभंकरने मल्हारला दिली आहे. तर, स्वरा कुणाकडे राहणार यावरून शुभंकर आणि मल्हार यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. दोघांनाही स्वराने आपल्याकडे राहावं असं वाटत आहे. मल्हार स्वराला आपल्या कुटुंबाचा भाग असल्याचं मानत आहे. तर, शुभंकर देखील ती आपली मुलगी असल्याच रिपोर्ट्स देत आहे. त्याच्याकडे स्वतःचे आणि स्वराचे डीएनए रिपोर्ट्स पुरावा म्हणून आहेत. मात्र, हे रिपोर्ट्स खोटे असल्याची कल्पना शुभंकरला नाही. तो याच रिपोर्ट्सचा दाखला देऊन स्वराची कस्टडी मागणार आहे.







