
शुभंकरने डीएनए रिपोर्ट्स दाखवून स्वरा आपली मुलगी असल्याचे सिद्ध केले आहे. मात्र, स्वरा ही त्याची मुलगी नसून पीहू ही शुभंकरची खरी मुलगी आहे. मात्र, हे कुणालाही कळू नये म्हणून मोनिकाने दोघींचे रिपोर्ट्स परस्पर बदलले होते. त्यामुळेच पीहूचे आणि स्वराचे रिपोर्ट्स अदलाबदली झाले आहेत. तर, शुभंकर आता स्वराला आपली मुलगी मानून बसला आहे. यामुळे आता तो स्वराला सोबत नेण्याचा हट्ट करणार आहे. परंतु, स्वरा ही मल्हारची मुलगी असल्याचे सत्य कुटुंबातील काही लोकांना माहित आहे. मात्र, कुणीही हे सत्य मल्हारला सांगत नाहीये.








