नुकताच आपण अधिपती आणि अक्षराच्या मेहंदी-हळद सोहळ्याची लगबग मालिकेत पाहिली. अधिपतीला आधीपासूनच या लग्नाविषयी शंका आहे. अक्षरा आपल्याशी लग्नासाठी का तयार झाली असेल, हा प्रश्न अधिपतीला पडला आहे. एकीकडे त्याला या लग्नाचा आनंद आहेच. मात्र, अक्षरावर या सगळ्याचा काय परिणाम होत असेल, याचा विचार देखील तो करत आहे.







