
या आधी अनेकदा शिल्पीच्या सगळ्या चुका पोटात घालून आईने तिला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. बाबांच्या विरोधात जाऊन तिने घर शिल्पीला देण्याचा हट्ट धरला होता. यामुळेच श्रेयस आणि अश्विनीला घर सोडून बाहेर जावे लागले होते. मात्र, जेव्हा अबबांच्या जीवावर बेतणारा प्रसंग आला तेव्हा, शिल्पीने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. तर, बाबा मृत्यूशी संघर्ष करत असताना देखील तिला केवळ संपत्ती मिळवण्याचा हव्यास होता. आपल्या मुलीचा हा अवतार पाहून आईला मोठा धक्का बसला. तिने अखेर माघार घेत आपला हट्ट सोडला आणि घर श्रेयसच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला.








